“ओएलएक्‍स’वरुन 3 लाखांचा गंडा

पिंपरी – ओएलएक्‍सवर कार विकण्याची जाहिरात देऊन एका व्यावसायिकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बावधन येथे घडला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर जनार्दन बकरे (वय-49, रा. आदित्य शगुन सोसायटी, बावधन) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. रोहीत उचिल, महेश कुमार, असित मलिक यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

बकरे यांना ओएलएक्‍स वर महेश कुमार व डॉ. रोहीत उचिल यांची हुंदाई क्रेटा (एमएच 46 / बी ए 0527) ही कार विकायची असल्याची जाहिरात दिसली. महेश व रोहीत यांनी बकरे यांना विश्वासात घेऊन असित मलिक याच्या स्टेट बॅंकेच्या खात्यावर तीन लाख 17 हजार 800 रुपये भरण्यास सांगितले. बकरे यांनी संपूर्ण रक्कम बॅंक खात्यावर भरली, मात्र आरोपींनी कार बकरे यांना दिली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)