ओएनजीसीवर सरकारची वक्रदृष्टी 

नवी दिल्ली – ओएनजीसीची 149 तेल आणि गॅस फील्डस सरकार खासगी कंपन्यांना विकण्याच्या तयारीत आहे. ओएनजीसी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने केवळ मोठ्यामोठ्या युनिट्‌सवर ध्यान केंद्रीत करावे असे सरकारचे म्हणणे आहे. ओनजीसीची काही युनिट्‌स परदेशी कंपन्यांना देण्याचा सरकारचा हा दुसरा प्रयत्न आहे.

गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात डीजीएचने (हायड्रो कार्बन महानिदेशनायल) खासगी कंपन्यांना देण्यासारख्या 15 युनिट्‌सची नोंद केली होती. यांत कच्च्या तेलाचा एकूण साठा 79.12 कोटी टन आणि गॅसचा साठा 333.46 अब्ज घनमीटर्स आहे.
अर्थातच ओएनजीसीने या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे. त्याऐवजी अशा युनिट्‌सचे आऊटसोर्सिंग करण्याची ओएनजीसीलाच परवानगी द्यावी अशी सरकारकडे त्यांनी मागणीच केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)