ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला अखेर जाग

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सांघात मोठे बदल

सिडनी: भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध तब्बल 71 वर्षांनंतर मायभूमीत पराभव स्वीकारल्यांनंतर ऑस्ट्रेलिया संघाला जाग आली असून भारताविरुद्धच्या मालिकेत खराब कामगिरी करणाऱ्या फलंदाजांना श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याऐजवी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नवोदित विल पुकोवस्की याला संधी मिळणार आहे तर जो बर्न्स आणि मेट रेनशॉ यांची पुन्हा संघात वर्णी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताविरुद्धचे एकसोटी मालिका गमावण्याचे सर्वात मोठे कारण हे आघाडीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या बनवण्यात आलेले अपयश होते. चार कसोटी सामन्याच्या मालिकेत सात डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला शतक झळकावता आलेले नाही. ऑस्ट्रेलियासाठी मालिकेत वयेक्तिक सर्वाधिक धावसंख्या 79 इतकी होती. स्थानिक क्रिकेटमध्ये अवघे आठ सामने खेळणाऱ्या 20 वर्षीय विलने 47च्या सरासरीने धावा बनविल्या आहेत. त्यामध्ये त्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध 243 धावांची खेळी केली होती. शॉन मार्श कसोटी मालिकेत आपला ठसा उमटवू शकला नसल्याने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून वगळन्यात आले आहे . त्यामुळे त्याचे कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तर मिचेल मार्शला आणि ऍरॉन फिंच यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

विल पुकोवस्की, जो बर्न्स आणि मेट रेनशॉ हे श्रीलंकेविरुद्दच्या एकमेव सराव सामन्यातही खेळणार असून संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी जो बर्न्सकडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन निवड समितीचे अध्यक्ष ट्रेवर होन्स म्हणाले, भारता विरुद्दच्या सामन्यांमध्ये आम्हाला हवे ते निकाल मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही संघात बदल करत आहोत. खरे सांगायचे तर ऍरॉन फिंच, शॉन मार्श, पीटर, मिचेल मार्श आमच्या अपेक्षांवर खरे उतरू शकले नाहीत. त्यांना कामगिरी सुधारण्याच्या संधी मिळाल्या होत्या. परंतु, त्याचा फायदा घेण्यात ते अपयशी ठरले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत निवड न झाल्याने त्याचा त्याची कारकीर्द संपुष्टात आली असे नाही. भरताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत हे महत्त्वाचे खेळाडू आहेत. तर पुढील विश्वचषक स्पधार्‌ आणि या खेळाडूंची प्रतिभा डोळ्यांसमोर ठेवूनही आम्ही रणनीती आखत आहोत, असेही ट्रेवर यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)