ऑस्ट्रेलिया उपांत्यपूर्व फेरीत दाखल

भुवनेश्‍वर: गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंड संघाचा 3-0 असा पराभव करून हॉकी विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्‍चित केली. असून अन्य सामन्यात चीनने आयर्लंडला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले आहे.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने ब गटात सहा गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडला 2-1 ने पराभूत केले होते. या पराभवामुळे इंग्लंडची चिंता वाढली आहे. इंग्लंडने चीनविरुद्धचा सामना 2-2 असा बरोबरीत राखला होता. ऑस्ट्रेलिया आपला शेवटचा सामना सात डिसेंबरला चीनविरुद्ध, तर इंग्लंडचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

तर, चीनच्या संघाने क्रमवारीत आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकाचे मानांकन असलेल्या आयर्लंड संघाला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. चीन संघाला 43 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जिन ग्यूने गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. पण चीनच्या खेळाडूंना या गोलचा आनंद जास्त वेळ साजरा करता आला नाही. आयर्लंडच्या एलन साऊदर्नने 44 व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)