ऑस्ट्रेलियाला कमी लेखत नाही- ईशांत शर्मा

सिडनी: ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकण्याची आमच्यासाठी ही सर्वात मोठी संधी आहे. परंतु, काही वादांमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट ढवळून निघाले असले आणि काही महत्वाचे खेळाडू नसूनही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात मालिका विजय संपादन करण्याची क्षमता आहे, असे मत भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज इशांत शर्माने व्यक्त केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर – गावस्कर चषकातील कसोटी मालिकेचे सुरुवात 6 डिसेंबरपासून ऍडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. पहिल्या सर्व सामन्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना इशांत शर्मा म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा संघ किती कमकुवत आणि किती प्रबळ आहे यांचा आम्ही विचार करत नाही. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये क्षमता असतेच म्हणूनच ते देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. जोपर्यंत आम्हाला हवा आहे तो निकाल मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही संघाला हलक्‍यात घेण्याचा आमचा विचार नाही. आमच्या खेळाडूंमध्ये विजय मिळवण्याची प्रेरणा असून सांघीक कामगिरीच्या जोरावर मालिका विजय हेच आमचे लक्ष्य आहे, असेही तो यावेळी बोलताना म्हणाला.

मागील ऑस्ट्रेलियायी दौरा आणि येथील परिस्थिती यावर बोलताना ईशांत म्हणाला, पुढे बोलताना मागील वेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता त्यावेळी भारताला 4-0ने पराभूत व्हावे लागले होते. सध्याचा कर्णधार विराट कोहलीने त्या मालिकेत चांगला खेळ करत फलंदाजीमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. या वेळी भारतीय संघाकडे चांगले जलदगती गोलंदाजांचा ताफा आहे. त्यामुळे आम्ही येथील परिस्थितीचा फायदा घेत आम्ही वर्चस्व निर्माण करू शकतो.
कारकिर्दीत चौथ्यांदा ऑस्ट्रेलियाचा दौरा करणारा यशात पुढे म्हणाला, या परिस्थितीत खेळण्याचा मला चांगला अनुभव आहे. त्यामुळे येथे खेळण्याचा दबाव जाणवत नाही. आमच्याकडे सर्व जागांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याने भारतीय संघ मजबूत आहे. प्रत्येक मैदानायावरील खेळपट्टी आणि तेथील वातावरणाचा विचार करून आमच्या संघाची निवड होईल. शेवटी वयक्तिक कीर्तिमान घडवण्यापेक्षा संघ जिंकण्याला आम्ही प्राधान्य देतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)