ऑस्ट्रेलियात माझा खेळ सुधारतो – मुरली विजय

सिडनी: ऑस्ट्रेलियाचे वातावरण माझ्या फलंदजीच्या शैलिशी मिळते जुळते असल्याने येथे आल्यास माझा खेळ सुधारतो असे विधान भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयने पहिल्या सराव सामन्यानंतर बोलताना केले आहे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून येत्या 6 तारखेपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे.

त्यापुर्वी झालेल्या एकमेव सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी मुरली विजयने तडाखेबाज फलंदाजी करताना शतक झळकावले होते. यानंतर बोलताना मुरली विजयने आपले मत मांडले आहे. यावेळी तो म्हणाला मी सध्या येथे खेळण्यासाठी संपुर्णपणे तयार आहे. इंग्लंड दौऱ्यातील अपयशानंतर मी तेथे कौंटी क्रिकेटमध्ये चांगली फलंदाज्की केली. तर त्यानंतर न्युझिलंडयेथे झालेल्या भारत अ संघाकडूनच्या सामन्यातही मी चांगली कामगिरी केली होती त्यानंतर मी ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्धच्या सामन्यातही आपले कौशल्य दाखवून दिले आहे. सध्या मी संघासाठी मैदानावर उतरुन संघाला चांगली सुरूवात करुन देण्यासाठी उत्सूक आहे असेही त्याने यावेळी सांगितले.

-Ads-

मी 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आलो होतो त्यावेळी ही मी चांगली कामगिरी केली होती. आताही मला त्याच प्रमाणे कामगिरी करायची आहे हे मी स्वताःला आल्यापासून समजावत आहे. त्यामुळे मला मी चांगली कामगिरी करेल याचा मला पुर्ण विश्‍वास आहे. तसेच सराव सामन्यात राहुल सोबत झालेल्या शतकी भागिदारी संदर्भात बोलताना तो म्हणाला की, मी आणि राहुल एकाच स्थानिक संघाकडून खेळतो त्यामुळे आम्ही एकमेकांचा खेळ समजून आहोत.

त्याचा फायदा आम्हाला नेहमीच होतो. राहुल एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या सोबत फलंदाजी करणे आणखिन सोपे वाटते. मला आशा आहे की सराव सामन्याप्रमाणे पहिल्या कसोटीतही आम्ही संघाला चांगली सुरुवात करुन देऊ.
ऑस्ट्रेलियातील मैदानांवर मी बऱ्याच चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यामुळे अश्‍या मैदानांवर पुन्हा खेळणे आनंददाई असते. येथिल मैदानांवर चेंडू उसळतो त्यामुळे तुम्हाला मागे सरकून खेळावे लागते. आणि माझी शैली बऱ्यापैकी बॅकफूटवर खेळण्याचीच असल्याने मला येथे खेळने सोपे जाते असेही त्याने यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)