ऑस्ट्रेलियातील दूतावासांना संशयास्पद पावडर पाठवणाऱ्यास अटक 

मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियातील अनेक दूतावासांना संशयास्पद पावडर पाठवाणाऱ्या व्यक्तीस ऑस्ट्रेलियन पोलीसांनी अटक केली आहे. भारत आणि अमेरिकेसह ऑस्ट्रेलियातील डझनभर दूतावासांना संशयास्पद पावडर पाठवून जगभर खळबळ माजवणाऱ्या सॅवस ऍवन याला पोलीसांनी शेपर्टन येथील त्याच्या घरी बुधवारी रात्री अटक केली आहे. सॅवस ऍवनने 7 जानेवारी रोजी मेलबोर्न आणि सिडनी येथील दूतावासांना ऍसबेसटॉस पावडर असेलेली एकूण 38 पाकिटे टपालाने पाठवली होती. त्याच्या या कृत्यामुळे 10 दूतावास बंद करावे लागले होते.

सॅवस ऍवनने पाठवलेल्या 38 पाकिटांपैकी पोलीसांनी 29 पाकिटे हस्तगत केली आहेत. बाकी पाकिट कोणाकोणाला पाठवली आहेत, त्याचा शोध लागल्याने ती पाकिटेही आपण लवकरच ताब्यात घेऊ असे पोलीसांनी म्हटले आहे. पाकिटातून त्याने पाठवलेली पावडर नेमकी कसली होते याचा निश्‍चित निर्णय अद्याप व्हायचा असला, तरी ती ऍसबेसटॉस पावडर असल्याचे सॅवस ऍवनच्या वकिलाने सांगितले आहे.धोकादायक पदार्थ टपालाने पाठवण्याचा आरोप सॅवन ऍवनवर ठेवण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सॅवन ऍवन ने जामिनासाठी अर्ज केलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)