ऑस्ट्रेलियातही परदेशी नागरिकांसाठी कडक नियम

कॅनबेरा : अमेरिकेपाठोपाठ आता ऑस्ट्रेलियानेही परदेशी नागरिकांसाठी नियम कडक करण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी गेल्याच आठवड्यात व्हिसाचे नियम कडक केले होते. त्यानंतर आता कांगारूंच्या देशाचे कायमचे नागरिकत्व मिळवणेही अवघड होणार असल्याचे दिसत आहे. नागरिकत्व मिळवण्यासाठी आता ऑस्ट्रेलियन व्हॅल्यूज ही परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच इंग्रजीची परीक्षादेखील अधिक कठीण असेल असे सरकारने स्पष्ट केले आहे. याखेरीज ऑस्ट्रेलियामध्ये किमान 4 वर्ष निवास केला असणेही आवश्‍यक होणार आहे. यापूर्वी ही मर्यादा एका वर्षाची होती. याबाबतचे विधेयक लवकरच ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये मांडण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)