ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याच वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली: भारतीय संघ 10 फेब्रुवारीपर्यंत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतात ऑस्ट्रेलिया तीन ट्‌वेंटी-20 आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या मालिकेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले आहे. 24 आणि 27 फेब्रुवारीला दोन टी-20 सामने होणार आहेत. त्यानंतर 2 ते 13 मार्च दरम्यान 5 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याची सुरुवात ट्‌वेंटी-20 सामन्यांनी होणार आहे. 24 आणि 27 फेब्रुवारीला अनुक्रमे बंगळुरु व विझाग येथे हे सामने होणार आहेत. त्यानंतर 2 ते 13 मार्च या कालावधीत पाच एकदिवसीय सामने खेळले जातील. त्या एकदिवसीय सामन्यांच्या आयोजनाचा मान हैदराबाद, नागपूर, रांची, मोहाली आणि नवी दिल्ली यांना मिळाला आहे.

मालिकेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे –

टी20 मालिका
24 फेब्रुवारी पहिला टी20 सामना बंगळूरू
27 फेब्रुवारी दुसरा टी20 सामना विशाखापट्टणम

एकदिवसीय मालिका
2 मार्च पहिला वन-डे सामना हैदराबाद
5 मार्च पहिला वन-डे सामना नागपूर
8 मार्च पहिला वन-डे सामना रांची
10 मार्च पहिला वन-डे सामना मोहाली
13 मार्च पहिला वन-डे सामना दिल्ली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)