ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय ! मॅक्सवेलचे दमदार शतक

बेंगलुरू:  भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या तडाकेबाज अर्धशतकीच्या खेळावर भारताने दुसऱ्या आणि अखेरच्या टी20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 191 धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावत 191 धावांचे लक्ष पूर्ण केले. आणि 7 विकेट राखून मालिका खिश्यात घातली. मॅक्सवेलने 55 बॉलमध्ये 113 धावांची दमदार खेळी केली.

भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या तडाकेबाज अर्धशतकीच्या खेळावर भारताने दुसऱ्या आणि अखेरच्या टी20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 191 धावांचे आव्हान ठेवले होते. विराट कोहलीने 38 चेंडूत (6 षटकार, 2 चौकार) नाबाद 72 धावा केल्या. विराटने आजच्या सामन्यात 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. टी20 क्रिकेटमधील विराटचे हे 20 वे अर्धशतक ठरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सलामीवीर लोकेश राहुलने 26 चेंडूत 47 धावा केल्या. तर यष्टीरक्षक एम.एस.धोनीने 23 चेंडूत (3 षटकार आणि 3 चौकार) 40 धावा केल्या. शिखर धवन 14 आणि ऋषभ पंत 1 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, जेसन बेहरनडोर्फ, नाथन कुल्टर आणि डार्सी शाॅर्ट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)