ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथकडून घटनेची कबुली…

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मीडियासमोर चेंडूशी छेडछाड चुकीने नाही तर रणनितीचाच भाग होता असं मान्य केलंय. चेंडूशी छेडछाड करून आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहरम करण्याचा आमचा प्रयत्न होता, संपूर्ण संघाला याबाबत माहिती होती, असं स्मिथने मान्य केलं. ही जबाबदारी कॅमेरून बेनक्रॉफ्ट याच्यावर सोपावण्यात आली होती असंही तो म्हणाला.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बेनक्रॉफ्ट पत्रकार परिषदेत आले. जे काही झालं ते टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झालं आहे. हा महत्वाचा सामना होता. पण चेंडूपासून कोणतीच मदत मिळत नसल्याचं पाहून सामन्यात पुनरागमन करता यावं यासाठी संघातील काही खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली स्मिथने दिली. चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. आणि माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,” असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)