मुंबई : न्यू साऊथ वेल्स (ऑस्ट्रेलिया) प्रांताच्या प्रमुख ग्लाडीज बेरजीक्लिअन यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा केली.

ग्लाडीज बेरजीक्लिअन यांनी सांगितले की, न्यू साऊथ वेल्स (NSW) ने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. विशेषत: आर्थिक सेवा, ऊर्जा, खाण, शेती व्यवसाय, शहरी पायाभूत सुविधा आणि पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक आरोग्य, औषधे, खेळ, कला आणि संस्कृती या क्षेत्रात एनएसडब्ल्यूने महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे. यापुढे शाळा, दवाखाने, रस्ते आदी पायाभूत सोयीसुविधांमध्ये गुंतवणूक करायची असून महाराष्ट्राशी आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. गुंतवणुकीसाठी अनेक उद्योजकांची महाराष्ट्राला पसंती असून 50 टक्क्यांपेक्षा जास्त थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. राज्यात मोठ्या शहरांच्या ठिकाणी विमानतळांना मान्यता मिळाली आहे. रेल्वे, मेट्रो यांचे जाळे तयार करणे सुरू आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचेही काम प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)