ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा कसून सराव 

सिडनी – भारता विरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील सात खेळाडूंनी नववर्षाच्या पहिल्या सकाळीच सराव सत्रात भाग घेतला. यावेळी नविन वर्षाच्या सुर्यप्रकाशासोबत ऑस्ट्रेलियाच्या 14 सदस्य असलेल्या संघातील 7 सदस्य ज्यात कर्णधार टिम पेन, नॅथन लायन, उस्मान ख्वाजा, ऍरोन फिंच, पिटर हॅंडस्कोम्ब आणि मार्नस लाबुश्‍चेग्ने यांनी सराव सत्रात सहभाग नोंदवल्याचा फोटो क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेब साईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.

यावेळी लेग स्पिनर मार्नस लाबुश्‍चेग्ने त्याचा सहकारी उस्मान ख्वाजाला गोलंदाजी करत होता. तर, ऍरोन फिंच यावेळी केवळ मैदानावर उपस्थित होता त्याने फलंदाजी न करता केवळ व्यायाम करण्यावर भर दिला. त्यामुळे आगामी सामन्यातून त्याला वगळ्ण्यात येण्याची शक्‍यता आणखिनच बळावली आहे. तर, इतर खेळाडूंनी न्यु साऊथ वेल्स संघाचे गोलंदाज ट्रेंट कोपलॅंड आणि मिकि एडवर्डयांच्या गोलंदाजीवर फलंदाजीचा सराव केला. तसेच यावेळी संघ निवडी बाबद शक्‍यता च्वर्तवताना फिंचला संघात समाविष्ट करताना त्याच्या फलंदाजी करण्याच्या क्रमवारीत बदल केला जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)