ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा; रोहन बोपण्णा-तिमिया बाबोस अंतिम फेरीत

मेलबर्न- भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची हंगेरियन साथीदार तिमिया बाबोस या जोडीने झुंजार विजयाची नोंद करताना ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. रोहन बोपण्णा व तिमिया बाबोस या पाचव्या मानांकित जोडीने उपान्त्य फेरीच्या लढतीत मारिया जोस मार्टिनेझ-सॅंचेझ आणि मार्सेलो डीमॉलिनर या जोडीचा प्रतिकार 7-5, 5-7, 10-6 असा मोडून काढला. विजेतेपदासाठी त्यांच्यासमोर अंतिम फेरीत गॅब्रिएला डाब्रोव्हस्की व मेट पेव्हिक या आठव्या मानांकित जोडीचे आव्हान आहे. डाब्रोव्हस्की-पेव्हिक जोडीने दुसऱ्या उपान्त्य लढतीत एलिना माकारोव्हा व ब्रूनो सोरेस यांच्यावर 6-1, 6-4 अशी मात केली.

बोपण्णा-बाबोस जोडीने त्याआधी उपान्त्यपूर्व फेरीत कोलंबियाचा युआन सेबॅस्टियन काबाल आणि अमेरिकेची ऍबिगेल स्पीअर्स या बिगरमानांकित जोडीचे कडवे आव्हान असे संपुष्टात आणले होते. तसेच बोपण्णा-बाबोस जोडीने दुसऱ्या फेरीत अमेरिकेची व्हॅनिया किंग आणि क्रोएशियाचा फ्रॅंको स्कुगर या जोडीचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. त्याअगोदर त्यांनी व्हिटिंग्टन व पेरेझ या ऑसी जोडीवर 6-2, 6-4 अशी मात केली होती.
तिमिया बाबोस-क्रिस्टिना लाडेनोविच जोडीला महिला दुहेरीचे विजेतेपद

-Ads-

हंगेरीची तिमिया बाबोस आणि फ्रान्सची क्रिस्टिना लाडेनोविच या पाचव्या मानांकित जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अनपेक्षितरीत्या एकतर्फी ठरलेल्या अंतिम सामन्यात बाबोस-लाडेनोविच या जोडीने एकेटेरिना माकारोव्हा आणि एलेना व्हेस्निना या द्वितीय मानांकित रशियन जोडीचा 6-4, 6-3 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडविला


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)