ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला व्हावा

मुख्यमंत्री : सीएम चषक क्रीडा आणि कला महोत्सवाचे उद्‌घाटन

हडपसर – सन 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंचा बोलबाला झाला पाहिजे. त्या तयारीसाठी राज्यातील तरुणांनी आजपासूनच मैदानात उतरणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारकडून या खेळाडूंना प्रशिक्षण व प्रोत्साहन दिले जात आहे. खेळाडूंच्या उदरनिर्वाहची काळजी सरकार घेईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीएम चषक क्रीडा आणि कला महोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हडपसर येथील मगरपट्टा सिटीतील अटल क्रीडा नगरी लक्ष्मी लॉन्स येथे गुरूवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्‍ता टिळक, आमदार योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, विजय काळे, मंगलप्रभात लोढा, भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष सुभाष जंगले यांसह आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ग्रामीण भागातील तरुणांमध्ये अधिक टॅलेंट असते त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना सहभागी करून संधी कशी मिळेल, याची संयोजकांनी काळजी घ्यावी.

स्वामी विवेकानंद जयंती दि. 12 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 50 लाख स्पर्धक सहभागी होणार आहेत. युवकांना क्रीडा आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडण्यासाठी ही सीएम चषक स्पर्धा आयोजित केली आहे, असे भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

टिळेकरांच्या चेंडूवर मुख्यमंत्र्याचा चौकार
आमदार योगेश टिळेकरांनी टाकलेल्या चेंडूवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकार मारून क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या, शिट्या वाजवून प्रतिसाद दिला.

हडपसर-मांजरीपर्यंत मेट्रो धावणारच !
भाषण संपल्यानंतर पुन्हा माईकसमोर येत मुख्यमंत्री म्हणाले, “आमदार टिळेकर मतदारसंघासाठी नेहमीच विविध मागण्या करतात. आता हिंजवडी ते शिवाजीनगर धावणारी मेट्रो पुढे थेट हडपसर-मांजरी पर्यंत धावेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)