ऑरलीन्स ओपन बॅडमिंटन स्पर्धा; कश्‍यप व समीर यांची उपान्त्यपूर्व फेरीत धडक

ऑरलीन्स – भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्‍यप आणि समीर वर्मा यांनी ऑरलीन्स ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र भारताच्या गुरुसाईदत्तला जागतिक कांस्यविजेत्या यान ओ जॉर्गन्सेनविरुद्ध 20-22, 21-17, 17-21 असा पराभव पत्करावा लागला.

ऑस्ट्रियन ओपन विजेत्या पाचव्या मानांकित कश्‍यपने आयर्लंडच्या जोशुआ मॅगीवर 21-11, 21-14 असा विजय मिळविला. तसेच स्विस ओपन विजेत्या व अग्रमानांकित समीर वर्माने स्थानिक खेळाडू थॉमस रक्‍सेलचा 21-16, 21-15 असा सहज पराभव केला. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळालेल्या कश्‍यपने दुसऱ्या फेरीत क्रोएशियाच्या वोमिनीर डुर्कींजॅकचा 21-16, 21-7 असा पराभव केला होता. तसेच समीर वर्माने रशियाच्या सर्जी सिरॅन्टला नमविले होते. आता कश्‍यपची लढत रास्मुस गेमकेशी, तसेच समीरचा सामना लुकास कॉर्वीशी होणार आहे.

महिला एकेरीत भारताच्या मुग्धा आग्रेला इंडोनेशियाच्या ग्रिगोरिया मेरिस्का तुनजंगकडून 11-21, 9-21 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच फ्रॅन्सिस आल्विन व के. नंदगोपाल या सहाव्या मानांकित भारतीय जोडीने मिलोस बोचाट व ऍडम क्वालिना या पोलंडच्या जोडीवर 15-21, 21-17, 21-17 अशी मात करून पुरुष दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)