ऑप्टोमेट्री अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा

निकाला जाहिर करण्याचे हायकोर्टाचे आदेश
मुंबई – ऑप्टोमेट्री कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. गेले वर्षभर निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या चाळीस विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहिर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती एस. व्ही. कोतवाल यांच्या खंडपीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाला(यूजीसी) दिले.
जुहू येथील लोटस महाविद्यालयाने 2016मध्ये ऑप्टोमेट्री कोर्सकरिता बी.एस्सीच्या चौथ्या वर्षातील पहिल्या बॅचसाठी 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. हा कोर्स मुक्त विद्यापीठाशी संलग्न होता. मात्र पहिले सत्र झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ऑप्टोमेट्री हा मेडिकल कोर्स असून तो मुक्त विद्यापीठाशी संलग्न केला जाऊ शकत नाही, असे नमूद करत यूजीसीशी पत्रव्यवहार केला.

राज्य सरकारच्या सध्याच्या नियमावलीनुसार सर्व मेडिकल कोर्सवर महाराष्ट्र वैद्यकीय शास्त्र प्राधिकरणाच्या प्रणालीअंतर्गत नियंत्रण आहे. तथापि, लोटस कॉलेजने आधीच विद्यार्थ्यांना दाखल करून घेतले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यूजीसीशी केलेल्या पत्रव्यवहाराला कॉलेजने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या आव्हान याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती एस. व्ही. कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विद्यार्थ्यांचे दुसऱ्या सत्राचे निकाल जाहिर करण्याचे निर्देश यूजीसीला दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)