सातारा – सातारा येथील ऑन्को लाइफ सेंटर येथे स्तनांचा कर्करोग झालेल्या 66 वर्षीय महिलेवर डॉ. करण चंचलानी यांनी
अत्याधुनिक पद्धतीने ब्रॅकीथेरपी केली. या ठिकाणी दाखल होण्याआधी त्यांच्या डाव्या ब्रेस्टवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना रेडिएशनसाठी ऑन्को लाइफ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. प्राजक्ता यांच्या छातीत छोटा ट्युमर आढळून आला. त्या ट्युमरमध्ये सर्व अनुकूल ट्युमरचे गुणधर्म होते. त्यांचे कक्षा गाठबिंदू निगेटिव्ह होते आणि त्यांची पॅथेलॉजिकल स्टेज पीटी1एन0 (स्टेज 1) ही होती. त्यांना हृदयविकार व मानसिक आजारासारखे इतर आजारही होते. त्यामुळे ब्रेस्टची स्थिती पाहण्यासाठी आणि योग्य निदान करण्यासाठी रेडियोथेरपी आवश्यक होती.
विस्तृत तपासणी केल्यानंतर ब्रॅकीथेरपीचा उपयोग करून ऍक्सिलरेटेड पार्शिअल ब्रेस्ट इर्रेडिएशन (एपीबीआय) करण्याचे नियोजन करण्यात आले. पारंपरिक रेडिएशन थेरपीला 6 आठवडे लागत असत. परंतु, या अत्याधुनिक पद्धतीला केवळ 1 आठवड्याचा कालावधी लागला. ही यशस्वी प्रक्रिया ठरली आणि उपचार पूर्ण झाल्याच्या दिवशी रुग्णाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
ऑन्को लाइफ सेंटरचे डॉ. करण चंचलानी म्हणाले, ब्रॅकीथेरपीमध्ये रेडियोऍक्टिव्ह मटेरिअल थेट ट्युमरच्या आत किंवा बाजूला ठेवण्यात येते. ब्रॅकीथेरपीला इंटर्नल रेडिएशन थेरपी असेही म्हणतात. त्यामुळे फिजिशिअन एक्स्टर्नल बीम रेडिएशनच्या तुलनेत थोड्या काळात थोड्या भागावर उपचार करण्यासाठी रेडिएशनचा मोठ्या प्रमाणावरील डोस वापरू
शकतो. ब्रॅकिथेरपीचे अनेक फायदे आहेत.
रेडिएशन अत्यंत उच्च पातळीच्या अचूकतेने देण्यात येत असल्याने कर्करोगावर उपचार करण्यासाठीही पद्धत खूपच परिणामकारक आहे. शरीरातून अत्यंत टारगेटेड आणि निश्चित प्रकारे रेडिओथेरपी देण्यात येत असल्याने याचे दुष्परिणाम कमी असतात. रुग्णाला इतरही आजार असल्यामुळे अधिक काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेणेही शक्य नव्हते. या थेरपीमुळे रुग्णाला लाभ झाला. या उपचारांसाठी 1 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे या उपचारांनंतर 2 ते 5 दिवसात बरे वाटू लागते, अशी पुष्टी डॉ. चंचलानी यांनी जोडली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा