ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर

 

ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे जुन महिन्यापासून नवीन पेट सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध झाली असून आतापर्यंत जवळजवळ 100 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. पेट सीटी स्कॅन ही कॅन्सर निदानाची खात्रीशीर पद्धत असून यामध्ये कॅन्सर शरीरामध्ये कितपत पसरला आहे, हे समजते. त्यामुळे कॅन्सर तज्ज्ञांना उपचाराची नेमकी दिशा ठरवायला मदत होते. तसेच उपचाराचा कॅन्सरपेशींवर होणारा परिणामही तपासता येतो. पेट सीटी स्कॅनसाठी सातारा व आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना लांबचा प्रवास करावा लागत होता व वेळेचाही अपव्यय होत होता. ही सुविधा सातारा येथेच उपलब्ध केल्याने रुग्णांना पेट सीटी स्कॅन करणे सोयीचे होणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व कोकण भागातील कॅन्सर रुग्णांना पेट सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करू शकलो, याचे समाधान ऑन्को लाईफ कॅन्सर सेन्टरचे चेअरमन उदय देशमुख यांनी व्यक्त केले. यानंतर आमच्या सेन्टरमध्ये जिनेटीक लॅब, नर्सिंग कॉलेज, डीएनबी फेलोशिप आणि वेदनाशामक उपचार (Palliative Care) सेवा सुरू करण्यात येणार आहेत, अशी पुष्टी देशमुख यांनी जोडली.
मागील तीन वर्षांपासून ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरने सातारा जिल्ह्यातील व आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार व निदानाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर हे साताऱ्यातील शेंद्रे येथे आहे. त्याची स्थापना उदय शिवाजीराव देशमुख यांनी केली. 52 बेडची सोय असलेले आणि प्रशिक्षित कर्मचारी असलेल्या या हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट व ऑन्को पॅथॉलॉजिस्ट आहेत.
या ठिकाणी अद्ययावत ऑपरेशन थिएटर असून त्याला सर्जिकल आयसीयू, ऑन्को पॅथॉलॉजि, केमोथेरपी विभाग, रेडिएशन थेरपी विभाग, कॅन्सर पुनर्वसन केंद्र, डे केअर ट्रीटमेंट आणि ऑन्को फार्मसी या सेवाही जोडलेल्या आहेत. या केंद्रात आतापर्यंत 5504 रुग्णांची नोंद झालेली आहे, 1245 रुग्णांनी रेडिएशन तर सुमारे 1503 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि 3817 केमोथेरपी देण्यात आल्या आहेत. या केंद्रात SBRT सारख्या प्रगत रेडिएशन तंत्राद्वारे रुग्णावर उपचार केले गेले आहेत. तसेच अनेक क्‍लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेल्या आहेत.शिवाय हॉस्पिटल हे निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे रुग्णाला त्याच्या आजाराचा विसर पडायला मदत होते. यापुढेही ऑन्को लाईफ कॅन्सर सेन्टरमध्ये उपचाराचे व निदानाचे सर्व प्रगत तंत्रज्ञान व पद्धती उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यवस्थापनाने व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)