ऑनलाईन व्यवहारांच्या फसवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथमस्थानी

नवी दिल्ली : ऑनलाईन व्यवहारांसाठी सरकारतर्फे प्रोत्साहन दिलं जात आहे, मात्र असं असलं तरी देखील ऑनलाईन फसवणुकीची तब्बल 25 हजार 800 प्रकरणं देशभरात समोर आली आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन होणाऱ्या फसवणुकीत देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगसंदर्भात तब्बल 179 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. वर्षभरातील ऑनलाईन फसवणुकीची माहिती शुक्रवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत सादर केली. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात ऑनलाईन फ्रॉडची 10 हजार 220 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये 111.85 कोटी रुपयांचा समावेश आहे.विशेष  म्हणजे, एक लाखांपेक्षा जास्त किमतीची फसवणूक झाल्याची तब्बल 380 प्रकरणं एकट्या महाराष्ट्रात समोर आली असून ,ऑनलाईन चोरट्यांनी 12.10 कोटी रुपयांवर डल्‍ला मारला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)