पुणे-ग्राहकांना ऑनलाईनद्वारे आपल्या वीजदेयकाचा भरणा सुलभतेने करता यावा. अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रेडीट कार्डचा अपवाद वगळता नेटबॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व युपीआय पध्दतीने विज देयकाचा भरणा केल्यास महावितरणने अशा ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे व महावितरणच्या मोबाईल ऍपद्वारे ग्राहक विज देयकाचा ऑनलाईन भरणा करु शकतात. ऑनलाईन विज देयकाचा भरणा करताना केवळ क्रेडीट कार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येईल. उर्वरित इतर सर्व पध्दतीने (नेटबॅंकींग, युपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड) विज देयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ग्राहकांनी वीजबील भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहून वीजबील भरण्यापेक्षा महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क ऑनलाईन वीजबील भरणा सेवांचा फायदा घ्यावा व विज देयकाचा भरणा ऑनलाईन करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)