ऑनलाईन ‘मोटिव्हेशन’

“ये विक्‍या, काय झालं रे? चेहरे के रंग काहे उडे है विकीबाबू? क्‍या बात है, तनीक हमको भी बताओ” असं म्हणत निखिलने कट्ट्यावर एंट्री मारली. आधीच खराब मूड असलेला विकी नजर वळवून कपाळावर आठ्या पाडत” आला आता हा आमची उडवायला” असं तोंडातल्या तोंडातच पुटपुटला. विक्‍याने सपशेल इंग्नोर मारल्याचं थोडस देखील वाईट वाटून न घेता निखिल थेट त्याच्या पुढ्यातच येऊन बसला. “ब्रेकअप झालं ना तुझं? सांगितलं मला पोरांनी… पण भाई तू टेन्शन नको घेऊ… तू एक काम कर झाकीर खानचे व्हिडीओ पाहत जा ! सॉलिड सांगतो रे तो…”

कॉलेज कट्ट्यांवर आजकाल असे डायलॉग भलतेच कॉमन झालेत, ग्रुप मधील किमान एकतरी मेम्बर असे मोटिव्हेशनल व्हिडीओ पाहण्याचा सल्ला हमखास देत असतो. आजकालच्या या ‘टेक्‍नोसॅव्ही’ तरुणाईला ‘मोटिव्हेशनल स्पीकर्स’ने भलतीच भुरळ पाडली असल्याचं चित्र बहुतांशी कॉलेजच्या कट्ट्यांवर पाहायला मिळतंय. आपल्या रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा शोधणाऱ्या तरुणाईला असे ‘मोटिव्हेशनल स्पीकर्स’ आशेचा किरण वाटू लागले आहेत. फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम या सोशल माध्यमांची सैर केल्यास अशा ‘मोटिव्हेशनल स्पीकर्स’ची भलीमोठी जंत्रीच आपल्याला सापडेल. या मोटिव्हेशनल स्पीकर्सनेदेखील आपापले ‘स्पेशलायझेशन्स’ निवडले असून ब्रेकअप झाल्यास अमुक स्पीकरचा युट्युब चॅनल, बॉडी बनवण्यासाठीच्या इन्स्पिरेशनसाठी तमुक स्पीकरचे फेसबुक पेज अशी वर्गवारी झाल्याचे पाहायला मिळते. यातील काही मोजके मोटिव्हेशनल स्पीकर्स आज आपल्या भेटीला घेऊन आलोय

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जय शेट्टी : इंटरनेटच्या दुनियेमध्ये जय शेट्टीची ओळख आधुनिक जमान्यातला संत अशी आहे. मूळचा भारतीय वंशाचा असलेला जय हा युकेचा नागरिक आहे. जयने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर भारतामध्ये येऊन साधू बनण्याचा निर्णय घेतला होता, त्याने सलग वर्ष भारतीय अध्यात्माचा अभ्यास करून मध्ये लोकांना प्रेरित करण्याच्या हेतूने आपला युट्युब चॅनल सुरु केला. जयच्या अध्यात्मातील ज्ञानामुळे त्याच्या व्हडिओसना इंटरनेटवर प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. आज जयच्या युट्युब चॅनलला मिलियन लोकांनी लाईक केले असून त्याची गणना जगातील सर्वोत्तम वक्‍त्यांमध्ये होते.

रिचर्ड विलियम्स : रिचर्ड विलियम्स हा देखील एक आघाडीचा मोटिव्हेशनल स्पीकर असून त्याला प्रिन्स इए या नावाने ओळखले जाते. सुरुवातीला हिप-हॉप संगीतामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या रिचर्डने भागवत गीते सारख्या अनेक प्राचीन ग्रंथांमधून प्रेरणा घेत लोकांना ‘इन्स्पायर’ करण्याचा निर्णय घेतला. आज रिचर्ड हा एक यशस्वी वक्ता असून त्याच्या फेसबुक पेजला जवळपास मिलियन लोक फॉलो करतात. रिचर्ड छोट्या छोट्या व्हिडीओजच्या माध्यमातून काळजाला भिडणारे संदेश देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

झाकीर खान : मूळचा स्टॅंडअप कॉमेडियन असलेल्या झाकीर खानकडे अनेक तरुण आज ‘मोटिव्हेशन’ म्हणून पाहतात. आपल्या अनोख्या शायरीतून थेट मनाला साद घालण्यामध्ये झाकीर माहीर आहे. त्याची हसता हसता दुःख सांगणारी अदा प्रेक्षकांना मंत्रमुघ्द सोडते. खासकरून झाकीर त्याच्या आयुष्यात झालेला प्रेमभंग या विषयावर विनोदी अंगाने बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे.

– प्रशांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)