ऑनलाईन मनी ट्रान्स्फरमध्ये चुका झाल्यास…

घरबसल्या आपल्या बॅंक खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्याची सोय आता चांगलीच लोकप्रिय होत आहे. बॅंकेत जाऊन कुणाच्या खात्यावर पैसे पाठविण्यापेक्षा ही पद्धत सोपी आणि कमी वेळेत पूर्ण होणारी असते. मात्र, ही सुविधा सोपी असली, तरी जोखमीची आहे. त्यामुळे कधी कधी चुकीचा खाते क्रमांक टाकला गेल्यास चुकीच्या व्यक्‍तीच्या खात्यावर पैसे जमा होतात. अशा वेळेस सर्वांत आधी यासंदर्भातील माहिती बॅंकेला द्यावी. तुमच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुमची बॅंक त्या माणसाच्या बॅंकेला याबाबत सूचना देते. ती बॅंक त्या माणसाकडून चुकीने ट्रान्स्फर झालेले पैसे परत करण्याची परवानगी मागितली जाते.

लाभार्थी पैसे परत करण्यास तयार झाला, तर ते पैसे तुमच्या खात्यात परत येतील; परंतु त्याने पैसे परत करण्यास नकार दिल्यास त्याच्याविरोधात न्यायालयात खटला भरू शकता.

-Ads-

कोणत्याही बॅंकेत तुमचे इंटरनेट खाते असेल, तर तुम्ही ऑनलाईन एनईएफटी आणि आरजीएफटीअंतर्गत पैसे ट्रान्स्फर करू शकता. यासाठी बॅंकेकडून मिळाला पासवर्ड आणि युजरनेम ऑनलाईन बॅंकिंग प्रणालीत टाकून लॉग-इन करावे. यानंतर थर्ड पार्टी ट्रान्सफर किंवा सेम बॅंक अकाऊंट होल्डरच्या पर्यायावर जावे. यानंतर ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याला पाठवावे. मात्र, अनेकदा अकाऊंट नंबर टाकताना चूक होते.

ज्या खात्यात पैसे पाठवायचे आहेत, त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी दोनदा खाते क्रमांक टाकावा लागतो. यातील एक चुकीचा असेल, तर बॅंक तो व्यवहार रद्द करते. अनेकदा दोनदा खाते क्रमांक टाकताना तुमच्याकडून एखादा आकडा चुकल्यास एखाद्या दुसऱ्याच व्यक्‍तीचे खाते तुमच्या खात्याशी जोडले जाते आणि चुकीच्या माणसाला पैसे पाठविले जातात. अनेकदा रक्‍कम भरताना चूक होते. यापासून वाचण्यासाठी हे उपाय केले जाऊ शकतात.

– जगदीश काळे 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)