ऑनलाईन प्रशिक्षणाचे विस्तार अधिकाऱ्याकडून कौतूक

चिंबळी- कुरुळी केंद्रात खेड तालुका पंचायत समितीच्या व शिक्षक विभागाच्या वतीने इयत्ता आठवीच्या नवीन अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झाले आहे. या उपक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी मुकूंद देडंगे यांनी भेट देऊन या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका शोभा सुतार व माजी केंद्र प्रमुख अंजली मेदनकर यांच्या हस्ते देडंगे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाळुंगे केंद्राच्या केंद्र प्रमुख सुनंदा भगतसिंह, हिरामण कुसाळकर, गजानन पुरी, संतोष शिंदे, सुरेश कातोरे, गौतम कांबळे, विस्तार अधिकारी प्रतिभा भागें, मुख्याध्यापक अरूण गायकवाड आदींसह परिसरातील शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)