ऑनलाईन तंटा निवारण यंत्रणेमुळे वेळ आणि पैशाची बचत होईल

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली – ऑनलाईन वाद निवारण यंत्रणा हा स्तुत्य उपक्रम असून यामुळे भारताची गुंतवणूकदार स्नेही देश म्हणून प्रतिभा निर्माण करून अधिकाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत होईल असे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सीआयएसीने आयोजित केलेल्या “ऑनलाईन वाद निवारण यंत्रणे’वरील राष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करत होते.

विधी आणि न्याय मंत्रालयाने याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी अभिनंदन केले. या उपक्रमामुळे न्यायालयांना जनतेला न्याय मिळवून देण्यावर लक्ष केंद्रीत करता येईल असे ते म्हणाले.

सध्याचे युग हे इंटरनेट आणि ई-व्यापाराचे युग आहे. ऑनलाईन वाद निवारण यंत्रणेमुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)