ऑनलाईन खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांना चाप

पुणे : अॅपच्या माध्यमातून विनापरवाना खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 113 कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून त्यांच्या विक्रीला चाप लावला आहे. या कंपन्यांना प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व कंपन्या स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट्‌स या कंपन्यांशी संलग्न आहेत. अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

बापट म्हणाले कि, ई कॉमर्स आणि ऑनलाईन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात आता अन्नपदार्थही ऑनलाईन पद्धतीने मिळण्यास सुरूवात झाली आहे. अॅप व संकेतस्थळाच्या माध्यमातून या कंपन्या शासनाची परवानगी न घेता खाद्य पदार्थ पुरवत होत्या. यातील काही कंपन्या पदार्थांचा ताजेपणा जपत नव्हत्या. भेसळयुक्त पदार्थ विकत होत्या असे लक्षात आल्याने ही कारवाई करण्यात आली. बृहन्मुंबई विभागात तब्बल 113 आस्थापना अशा पद्धतीने गैरव्यवहार करत असल्याचे दिसून आले. यातल्या अनेक कंपन्या घरपोच सेवा देत होत्या. तथापि त्यांनी खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण व परवाने घेतले नसल्याचे तपासणीमध्ये आढळून आले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात ही कारवाई करण्यात आली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)