ऑनलाईन खरेदीतून अडीच लाखांची फसवणूक

पिंपरी, (प्रतिनिधी) – बॅंकेचा लॉग इन आयडी व पासवर्ड घेऊन अडीच लाखांची खरेदी करुन फसवणूक करण्यात आली. याबाबत सुधाकर अकेल्ला (वय 41, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी तीन अज्ञात मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन अनोळखी मोबाईल धारकांनी अकेल्ला यांच्याकडून त्यांच्या बॅंकेचा लॉग इन आयडी व पासवर्ड घेतला. त्याआधारे एकूण दोन लाख 52 हजार 245 रुपये किंमतीचे पाच आयफोन खरेदी केले. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)