ऑनलाईन औषध विक्री बंदीच्या लढ्याला

शिंदे यांच्या प्रयत्नामुळे यश : पाटील

सातारा – औषधाच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालावी म्हणून 3 वर्षे सुरू असलेल्या देशव्यापी लढ्याला महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे (अप्पा) यांच्या प्रयत्नामुळे यश आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे संघटक सचिव मदन पाटील व सातारा जिल्हा अध्यक्ष प्रविण पाटील यांनी दिली.
ऑनलाईन फार्मसीचा देशव्यापी लढा आज यशस्वी झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

औषधे जी प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळू शकतील त्यामुळे तरूण पिढीला धोका निर्माण होऊ शकतो या बाबी आप्पांनी केंद्रशासनाला निदर्शनास आणून दिल्या होत्या. अखिल भारतीय देशव्यापी 3 बंद पुकारले.ज्यामध्ये 9 लाख रिटेलर औषध विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता मात्र केंद्रशासनाने दखल घेतली नव्हती त्यामुळे आप्पांनी दिल्लीतील त्वचा विशेषज्ञ तज्ञ जहीर अहमद व वकील नकुल मोहता यांच्याद्वारे हा लढा लढला व त्याला यश देखील मिळाले,असेही त्यांनी सांगितले.

देशभरातील ऑनलाइन वैद्यकीय विक्रीवर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातल्याच्या निर्णयाबाबत आनंद झाला असून ऑनलाईनच्या माध्यमातून आरोग्यासंबधीच्या मोठ्या जटिल प्रश्‍नाची सोडवणूक न्यायालयामुळे झाल्याचे समाधान देखील वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी ई-फार्मासिस्टना देशभरात ऑनलाइन औषधे विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आणि केंद्र व सरकारला बंदी आदेश ताबडतोब ते लागू करण्यास सांगितले. मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्हीके राव यांच्या खंडपीठाने दिल्लीस्थित त्वचा विशेषज्ञ तज्ञ जहीर अहमद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना आदेश दिले की, दररोज लाखो औषधे इंटरनेटवर विकली जाऊ शकतात. रुग्णांना आणि डॉक्‍टरांना यामुळे बरेच धोके होणार आहेत.
वकील नकुल मोहता यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेत अहमद म्हणाले की ड्रग्स ऍण्ड कॉस्मेटिक्‍स ऍक्‍ट, 1 9 40 आणि फार्मेसी कायदा, 1 9 48 च्या अंतर्गत औषधे ऑनलाइन विक्री करण्याची परवानगी नाही. याचिकाकर्त्याने ठळकपणे सांगितले की 2015 मध्ये ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सर्व सरकारी ड्रग्ज कंट्रोलर्सनी ऑनलाइन विक्री थांबवून, सार्वजनिक आरोग्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्पष्टपणे निर्देश दिले होते, हे असूनही, लाखो औषधे ऑनलाइन विकली जात आहेत.

घटना कलम 21 नुसार सार्वजनिक आरोग्याचे हित जपण्याची जबाबदारी पार पाडण्यात सरकार अपयशी ठरल्याचे याचिकेत म्हटले आहे. यामध्ये ऑनलाईन खरेदी करताना इतर सामान्य गोष्टींच्या विरूद्ध औषधे खूप शक्तिशाली आहेत आणि त्याचा गैरवापर मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. काही औषधांमध्ये सायकोट्रॉपिक घटक आहेत जे सहज इंटरनेटवर ऑर्डर केले जाऊ शकतात आणि आपराधिक कारवाई किंवा ड्रग्ज गैरवर्तन यासाठी त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो असे ही त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)