ऑनलाईन औषध विक्रीविरोधात शिरूर तहसीलदारांना निवेदन

शिरूर-ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय केमिस्ट संघटनेने हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केमिस्ट असोसिएशन ऑफ शिरूर तालुका यांच्या वतीने शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी केमिस्ट असोसिएशन पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाबाजी गलांडे शिरूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अतुल चव्हाण, दीपक तातेड, पुष्कराज कोळपकर, हनुमंत गाडे, पराग कोळपकर, सुहास गांजे, प्रताप थोरात, नामदेव घावटे, विजय ढमढेरे, अल्पेश चोरडिया, अमोल बोबडे, रामदास शितोळे यांसह केमिस्ट असोसिएशनचे सभासद उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाबाजी गलांडे यांनी माहिती देताना सांगितले की, ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या वतीने ऑनलाईन औषध विक्री विरोधात दोन महिन्यांपूर्वी देशव्यापी संप पुकारला होता. बेमुदत करण्यात आलेल्या या संपाची दखल घेऊन ऑनलाईन औषध विक्रीला उच्च न्यायालयाने बंदी घातली होती व औषध विक्री ही अधिकृत औषध विक्रेत्यांनीच करावी असा निर्णय दिला होता. त्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुशिल शहा व सचिव अनिल बेलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनास पाठिंबा देत शिरूर तालुका केमिस्ट अससोसिएशनने तहसीलदार शिरूर यांना निवेदन दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)