ऑनलाईन उताऱ्यातील चूकांमुळे शेतकऱ्यांची धावपळ

नागठाणे – चुकीच्या दुरुस्त्या न करता अत्यंत घाई गडबडीत जिल्हा महसूल प्रशासनाने जिल्हा संगणीकरण पूर्ण झाल्याचे घोषीत केले आहे. मात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन सात-बाऱ्याची प्रत काढल्यानतंर त्यातील चूकांमुळे धावपळ करावी लागत आहे. त्यात काही शेतकऱ्यांची 7/12 उताऱ्यातून नावेच गायब झालेली दिसतात तर काहींमध्ये चूकीची नावे समाविष्ट झाल्यामुळे त्यातील दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारताना दिसत आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महसुल विभागाने रात्रंदिवस काम करून शेतकऱ्यांचा 7/12 ऑनलाईन संगणकिकृत केला. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला 7/12 कुठेही पहाता येणे किंवा काढता येणे सोपे झाले. सातबारा उताऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाने महसुल विभागाचे संकेतस्थळही तयार केले. मात्र अलीकडेच सातारा तालुक्‍यातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची 7/12 उताऱ्यावरिल नावे गायब झाल्याने शेतकऱ्यांची सात बारा दुरूस्तीसाठी धावपळ सुरू झाली आहे. या धावपळीत आर्थिक व मानसिक झळ शेतकऱ्यांना बसत आहे.तर महसुल विभागाकडुन या झालेल्या चुकीची झळ शेतकऱ्यांनाच देणार का , असा ही सवाल उपस्थीत होवू लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)