ऑनलाइन 50 हजारांची फसवणूक

पिंपरी – क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट रिडीम करण्याचे सांगून एका तरुणाची 50 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.

संजय शंकर पाटील (वय-29 रा. स्वामी विवेकानंद नगर, वाकड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोबाइल वरुन फोन करून फसवणूक करणाऱ्या अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास आरोपीने मोबाईल क्रमांक 9205521412 वरुन फिर्यादी संजय पाटील यांना फोन केला. एसबीआय क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट्‌स रिडीम करण्याचे सांगून क्रेडिट कार्डवरची माहिती घेतली. त्यानंतर 50 हजार रुपये ट्रान्सफर करून ऑनलाईन फसवणूक केली. सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील याबाबत अधिक तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)