ऑनलाइन सात-बारा संगणकीय प्रणालीत जिल्हा नाशिक विभागात दुसऱ्या क्रमांकावर 

तहसीलदार एफ. आर. शेख : उर्वरित गावांचे ऑनलाइन सातबाराचे काम युद्धपातळीवर सुरू
नगर – जिल्ह्यातील 1602 तलाठी सजांपैकी 1072 गावांचे सात-बारा ऑनलाइन झाले आहे. ऑनलाइन सात-बारा संगणकीय प्रणालीमध्ये अहमदनगर जिल्हा नाशिक विभागात दुसरा क्रमांकावर आहे. आगामी 6 महिन्यांच्या कालावधीत उर्वरित गावातील सातबाराही ऑनलाइन होणार असून, यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असल्याची माहिती महसूल शाखेचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.

नागरिकांच्या वेळ, पैशाची बचत व्हावी व सात-बारा विना कटकटीने नागरिकांना उपलब्ध व्हावा, राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्यातील सर्व उतारे ऑनलाइन करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून अधिक काळापासून ऑनलाइन सातबाराचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जिल्ह्याचे आतापर्यंत 66 टक्के काम पूर्ण झाले आहे. नाशिक विभागात नंदूरबार जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या 887 असून, 638 गावांचे सात-बारा ऑनलाइन झाले असून, 71.93 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर अहमदनगर-1602 गावांपैकी 1072 सात-बारा ऑनलाइन झाले असून 66.92 टक्के काम पूर्ण झाले आहे. जळगाव-1502 गावांपैकी 949 गावांचे सातबारा ऑनलाइन झाले असून, 63.18 टक्के काम पूर्ण झाले आहे. धुळे-678 गावांपैकी 322 गावांचे सात-बारा ऑनलाइन झाले असून, 47.49 टक्के काम पूर्ण झाले आहे. नाशिक-1966 गावांपैकी 777 गावांचे सातबारा ऑनलाइन झाले असून, 39.52 टक्के केवळ काम पूर्ण झाले आहे. नाशिक जिल्हा मात्र नाशिक विभागात पिछाडीवर आहे. जिल्ह्यात 1602 गावे असून, त्यापैकी अंतिम प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या 1 हजार 72 गावांचे सातबारा ऑनलाइन करण्यात आले असून, जिल्ह्यात 12 लाख 54 हजार 771 सातबाऱ्यांची संख्या आहे. या उताऱ्यात तलाठ्यांना काहीही हस्तक्षेप करता येणार नाही, जर बदल करावयाचा असेल तर तो तहसीलदार यांच्या परवानगीनेच करावा लागेल, उर्वरित गावांचे सातबारा हे येत्या 6 महिन्यापर्यंत ऑनलाइन होणार असून, यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे.

-Ads-

तालुकानिहाय सातबारा ऑनलाइन झालेली गावे
अहमदनगर-84, अकोले-114, कर्जत-71, कोपरगाव-53, जामखेड-51, नेवासा-88, पाथर्डी-95, पारनेर-83, राहाता-55, राहुरी-70, शेवगाव-70, श्रीगोंदा-78, श्रीरामपूर-41, संगमनेर-119 असे एकूण 1602 गावांपैकी 1072 गावात सातबारा ऑनलाइन झाले आहे.
एडिट मॉड्यूल सॉफ्टवेअर उपलब्ध
दफ्तरातील सातबारा आणि संगणकावरील सातबारा यामध्ये थोडी तफावत असल्याने सार्वत्रिक ऑनलाइन सात-बारा सध्या उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठीच एडिट मॉड्यूल म्हणजेच सात-बारा दुरुस्तीचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)