“ऑनलाइन’ शिष्यवृत्ती ऑफलाइन करण्याची नामुष्की!

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य सरकारच्या विविध योजनांमधील भ्रष्टाचार निपटून काढून पारदर्शी कारभाराची सुरुवात व्हावी यासाठी थेट लाभाच्या सर्व योजना “ऑनलाइन’ करण्याच्या धोरणाचा पुरता फज्जा उडाल्यानंतर आता उच्च शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती आता “ऑफलाइन’ करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. “महाडीबीटी’ पोर्टलऐवजी पूर्वीच्या प्रमाणे शिष्यवृत्ती देणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी दिली.

शिष्यवृत्तींची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालयाने विकसित केलेली “महाडीबीटी’ ही प्रणाली पूर्णत: फसल्यामुळे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळावा यासाठी शिष्यवृतीची योजना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन करण्यात आली होती. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे कर्जमाफी योजनेप्रमाणेच शिष्यवृत्ती योजनेचाही बोजवारा उडाला आहे.

तंत्रशिक्षण विभागाच्या दोन योजना महाडीबीटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे समाजकल्याण विभागाने महाडीबीटीऐवजी पूर्वीच्या प्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर उच्च शिक्षण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती ही महाडीबीटीच्या माध्यमातून ऑफलाइन दिले जाणार असल्याचे धनराज माने यांनी आज स्पष्ट केले.
राज्य शासनाने सुरू केलेली महाडीबीटी पोर्टलमधून राज्य शासनाच्या विभाग बाहेर पडत आहेत. शिक्षण विभागाने स्वतंत्रपणे शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतल्याने राज्य शासनाचीच महाडीबीटी योजना आता पूर्णत: फसल्याचे स्पष्ट होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)