ऑनलाइन युगातही रोज सहा हजार पत्रे

गोडोली, दि. 23 – संदेश वहनाच्या आधुनिक युगात मामाच पत्र हरवले असले तरी भारतीय टपाल सेवेचे महत्त्व आजच्या स्थितीतही कायम आहे. ई-मेल, सोशल मीडियाच्या काळात दररोज शहरात सहा हजार पत्रे लिहिली जातात. त्यामुळे टपाल कार्यालय अजूनही उर्जितावस्थेत आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे.
ईमेल, फेसबुक, व्हॉट्‌सऍप आदी संदेश वहनाच्या माध्यमांचा जन्म होण्यापूर्वी टपाल सेवेला फारच महत्त्व होते. संदेश देवाणघेवाणचे टपाल सेवा एकमेव व सर्वांना परवडेल, असे सुलभ साधन होते. पूर्वी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक पोस्टमनची वाट पाहात होते. हा पोस्टमन दादा, काका, मामा, आत्या आदी आप्तेष्टाच्या खुशालीचे पत्र घेऊन येत होता. एवढेच नव्हे तर पैशाची मनिऑर्डरसुद्धा घरपोच देत होता. परंतु कालातंराने टपाल सेवेचा उपयोग कमी होऊ लागला. तारेची कडकड तर बंदच पडली आहे.
संदेश वहनाची साधने कमी दरात उपलब्ध होत असल्याने टपाल सेवा कमी झाली आहे. ईमेल, फेसबुक, व्हॉट्‌सऍप यासह इतर यंत्रणानी चांगलीच उचल खाल्ली. आज प्रत्येकाच्या घरातील व्यक्ती दोन ते तीन साधे किंवा ऍन्ड्रॉईड मोबाइल आहेत, असे असले तरी मात्र, गोपनियता व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टपाल सेवेचे महत्त्व अद्यापही कमी झाले नाही. कुरिअरची सेवा देणार्या कंपन्यांपेक्षा टपाल सेवेची आजही विश्वासर्हता कायम आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक महत्त्वाच्या कामासाठी टपाल सेवेला प्रथम पंसती देत आहेत. सन 1874 मध्ये सुरू झालेल्या भारतीय डाक सेवेनेसुद्धा स्पर्धेत टिकण्यासाठी ऑनलाइन सेवेत पदार्पण केले आहे. अनेक शहरात पोस्टाची एटीएम सेवा सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा असंख्य नागरिक लाभ घेत आहेत. त्या सुविधेचा अनेक नागरिक उपयोग घेत आहे.

शहरात एकूण 23 पत्र पेट्या आहेत. त्यातून दररोज सुमारे साडेसहा हजार टपाल निघत आहे. बाहेरगावावरून आलेले पत्रे, पाकीटे, मनिऑर्डर, पार्सलचे वितरणाचे काम दररोज पोस्टमनच्या माध्यमातून करण्यात येते. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. पर्यायाने नागरिक संख्येत वाढ होत आहे. आजपर्यंत शहराची लोकसंख्या 4 लाखांपर्यत आहे. पोस्टमनची संख्या कमी व त्यांचे काम वाढल्याने कार्यरत पोस्टमनला अधिक काम करावे लागत आहे. यावरून आजही टपाल सेवेचे महत्त्व असल्याचे दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)