ऑनलाइन पोस्टल मतपत्रिका पद्धती विकसित

सी-डॅकचे सहकार्य : नोकरदार वर्गासाठी निवडणूक आयोगाचे पाऊल

पुणे – नोकरदारांना कर्तव्य बजावत असताना आपल्या मतदारसंघात सहजगत्या व सुरक्षितपणे मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाइन (इलेट्रॉनिकली ट्रान्समिटेड) पोस्टल मतपत्रिका पद्धती विकसित केली आहे. ही पदती सी-डॅकच्या (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडवान्सड कॉम्पुटिंग) मदतीने विकसित करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नेहमीच्या प्रचलित पद्धतीमध्ये पोस्टाने मतपत्रिका पाठविणे वेळखाऊ व जिकिरीचे काम होते. नवीन इलेक्‍ट्रोनिक्‍स ट्रान्समिटेड “पोस्टल बॅलट सिस्टीम’ म्हणजेच “ईटीपीबीएस’ पद्धती काहीशी प्रचलित पोस्टल मतदान पदतीच्या धर्तीवरच कार्यरत असणार आहे. नवीन पद्धतीमध्ये फक्त मतदान पत्रिका ऑनलाइन पद्धतीमध्ये पाठविली जाईल. अशी मतपत्रिका डाउनलोड करण्यासाठी “ओटीपी’ नंबर दिला जाणार आहे. या पद्धतीने प्राप्त झालेली मतदान पत्रिका भरून म्हणजेच मतदान करून मतदाराने यासंबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास पोस्टाने पाठवायची आहे.

“ही पद्धती अत्यंत सुरक्षित असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यामध्ये दोन स्तरावर सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात आली आहे. मतदानाची गुप्तता राखण्यासाठी “ओटीपी’ व “पिन’ दिला जाणार आहे. तसेच क्‍यू आर कोड (क्विक रिस्पॉन्स) दिला जाणार असल्याने मतदाराने दिलेल्या मतदानाची नकल करणे शक्‍य होणार नाही,’ असेही मोनिका सिंह यांनी सांगितले. “पिन’ असल्याशिवाय “ऑनलाइन’ पाठविलेली मतदान पत्रिकेची उकल करणे, त्याची प्रिंट काढणे व त्याची संबंधित मतदाराला डिलिव्हरी करणे शक्‍य होणार नाही. या सर्व बाबीमुळे “ईटीपीबीएस’ पद्धती अधिक सुरक्षित असल्याचे मोनिका सिंह यांनी सागितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)