ऑनलाइन डेटिंगचा व्यावसायिक व्यक्तीला ६० लाखांना फटका

बंगळुरू : ऑनलाइन डेटिंग वेबसाईटवर महिलेशी मैत्री एका व्यावसायिकाला चांगलीच महागात पडली आहे. या महिलेने व्यावसायिकाला तब्बल ६० लाखांचा चुना लावला आहे. एका व्यावसायिकाने डेटिंग वेबसाइटवर स्वत:ची माहिती भरली होती. ती पाहून एका महिलेने त्या व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात ओढले. आपले नव ‘अर्पिता’ असल्याचे त्या महिलेने सांगितले होते.

काही दिवसांनंतर त्यांच्यातील मैत्री वाढली आणि त्यांनी एकमेकांना आपापला मोबाइल नंबर दिला. पुढे त्यांच्यातील मैत्री अधिकच वाढल्यानंतर अर्पिताने वडील आजारी असल्याचे सांगत ३० हजार रुपये मागितले. व्यावसायिकानेही मैत्रीखातर पैसे पाठवले. त्यानंतर परत अर्पिताने वडिलांच्या आजारपणाचे कारण देत डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान अनेकदा पैसे मागितले.

पुन्हा अर्पिताने १९ लाख रुपये रुपाली मजुमदार आणि ४० लाख ७० हजार रुपये कुशन मजुमदार यांच्या खात्यात पाठवायला सांगितले. व्यावसायिकानेही तिच्यावर विश्वास ठेवत मैत्रीसाठी पैसे पाठवले. मात्र काही काळानंतर अर्पिताने त्याला फोनवर उत्तर देणे बंद केले. तेव्हा त्याला आपण फसवले गेलो याची जाणीव झाली. ६० लाखाचा चुना लावल्याप्रकरणी अर्पिताविरोधात त्याने सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)