‘ऑनलाइन’चे दृष्टचक्र; ‘वेटिंग’चे भूत मानगुटीवर

लाखो वाहनचालक लायसन्सच्या प्रतीक्षेत : आरटीओचा कारभार सुधारणार कधी?


परीक्षा देण्यासाठी 45 ते 50 दिवस प्रतीक्षा

 

पुणे – प्रादेशिक परिवहन कायद्यानुसार दुचाकीच्या शिकाऊ परवान्यासाठी परीक्षा दिली असेल, तर चारचाकीच्या शिकाऊ परवान्यासाठी पुन्हा परीक्षा देण्यातून सुट मिळते. मात्र, ऑनलाइन अपॉईन्मेंट पध्दतीमध्ये पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागत आहे. यामुळे राज्यातील लाखो नागरिकांना पुन्हा ऑनलाइन अपॉईन्मेंट घेऊन महिनाभर “वेटिंग’ करावे लागत आहे.

राज्याच्या परिवहन विभागात तीन वर्षापूर्वी शिकाऊ व पक्का परवाना ऑनलाइन पध्दतीने अनिवार्य करण्यात आला आहे. यासाठी “सारथी-1′ हे सॉफ्टवेअर सुरू करण्यात आले होते. कायद्यातील तरतुदीनुसार एखाद्या अर्जदार दुचाकीसाठी शिकाऊ परवाना परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, तर चारचचाकी वाहनाचा शिकाऊ परवाना काढताना त्याला परीक्षेतून सवलत दिली जाते. मोटार वाहन कायदा 1988 नुसार कलम 11(3) प्रमाणे ही तरतूद आहे. मात्र या तरतुदीचे पालन परिवहन विभागाकडून होत नाही.

शिकाऊ परवान्यासाठी छायाचित्र, स्वाक्षरी, अंगठा आदी डेटा सिस्टिमवर उपलब्ध असते. हा डेटा नव्याने दाखल झालेल्या सारथी 4.0 संगणक प्रणालीमध्ये “मायग्रेन’ झाला आहे. यामुळे एखाद्या दुचाकीस्वाराने चारचाकी वाहनाच्या शिकाऊ परवान्यासाठी अर्ज केला, तर त्याला परिक्षेतून सवलत देऊन शिकाऊ परवाना देणे आवश्‍यक आहे. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालय ही सवलत न देता त्याला पुन्हा शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सांगत आहे. सारथी 4.0 मध्ये तशी सोय असतानाही जाणीवपूर्वक अपॉईनमेंट घेऊन एक महिन्याचे “वेटिंग’ करायला लावले जात आहे. याप्रकारामुळे ऑनलाइन अपॉईन्मेंटचे “वेटिंग’ही राज्यभरात वाढत आहे. “वेटिंग’ वाढल्यामुळेच एक ते सव्वा महिन्यानंतरची अपॉईन्मेंट नागरिकांना मिळत आहे.

सवलत देण्याची मागणी
यासंदर्भात परिवहन उपायुक्त (संगणक विभाग) संदेश चव्हाण आणि परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांना एक पत्र लिहण्यात आले आहे. कायद्यातील तरतूदीची पायमल्ली न करता नागरिकांना परीक्षेतून सवलत देण्यात यावी, अशी मागणी यामध्ये केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)