ऑडिओ कॅसेट विक्रेता ते दिग्दर्शक – मधुर भांडारकर

सुरुवातील मी ऑडिओ कॅसेट घरोघरी जाऊन विकायचो. त्यानंतर मला वाटायला लागलं की मी फिल्म्स बनवू शकतो. मी फिल्म इंस्टिट्यूटमध्ये जाऊन प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडे कोणतीही पदवी नसल्यामुळे मला तो मिळाला नाही. त्यामुळे अन्य दिग्दर्शकांकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करुन लागलो आणि मग मला एक स्वतंत्र फिल्म बनविण्याची संधी मिळाली. त्यानंतर आलेल्या चांदणीबार या चित्रपटामुळे मी सर्वांपर्यंत पोहोचलो अशा शब्दांत मधुर भांडारकर यांनी आपला प्रवास सांगितला.

यावेळी ते म्हणाले, माझा पहिला चित्रपट त्रिशक्‍ती जेव्हा फ्लॉप ठरला तेव्हा लोकांनी मला तू आता फिल्म इंडस्ट्रीत येऊ शकत नाहीस, तू हरलास अशा प्रकारे सुनावलं पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. देशात फुटकचे सल्ले देणारे खूप लोकं आहेत. म्हणूनच मी माझ्या पुढच्या फिल्मकडे लक्ष केंद्रीत केले. मी शिक्षण घेतलं नाही हे मी जाहीरपणे मान्य करतो पण आज आयआयएम, अहमदाबाद सारखी संस्था माझ्या कार्पोरेट या फिल्मचा अभ्यास करते आहे हे ऐकून बरं वाटतं.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)