ऑटोमोबाईल, बांधकाम क्षेत्रांत रोजगारनिर्मिती

नवी दिल्ली – मार्च महिन्यामध्ये ऑटोमोबाईल, बांधकाम आणि इंजिनियरिंग यासारख्या नॉन आयटी क्षेत्रांत रोजगार भरतीचे प्रमाण 3 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे नोकरी जॉबस्पीक निर्देशांकानुसार समजते. सध्या अजूनही आयटी क्षेत्रात अजूनही रोजगारनिर्मितीबाबत साशंकता दिसून येते. सध्या या क्षेत्रात काही महिने ही स्थिती स्थिर राहण्याची शक्‍यता असून नंतर त्यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे नोकरी डॉट कॉमचे प्रमुख विक्री अधिकारी व्ही. सुरेश यांनी म्हटले.

गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत मार्चमध्ये वाहन आणि त्यांचे सुटे भाग क्षेत्रातील रोजगारात 33 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. यानंतर अवजड मशिनरी 23 टक्‍के, बीपीओ आणि विमा क्षेत्रात अनुक्रमे 11 आणि 6 टक्‍क्‍यांनी अधिक रोजगारनिर्मिती झाली. अनुभवानुसार 16 पेक्षा जास्त वर्षांच्या अनुभव असणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील रोजगार भरतीमध्ये 8 टक्‍के, चार ते सात वर्षांच्या अनुभवात 3 आणि 3 वर्षांपेक्षा कमी अनुभव असल्यास त्यामध्ये 6 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. शहरांनुसार भरतीचे प्रमाण कोलकातामध्ये 5 टक्‍के, मुंबईत 4 टक्‍के आणि दिल्ली, एनसीआरमध्ये 3 टक्‍के दिसून आले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)