ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणी राजीव सक्‍सेनाना जामीन

नवी दिल्ली – अतिमहत्वाच्या व्यक्‍तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अटक झालेल्या राजीव सक्‍सेना यांना दिल्लीतील न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी सक्‍सेना यांना 5 लाख रुपयांचा जामीन आणि तेवढ्याच रकमेच्या दोघा हमीदारांच्या आधारे जामीन मंजूर केला. सक्‍सेना यांना जामीन मंजूर करताना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये आणि आवश्‍यकता भासेल तेंव्हा तपास कार्यासाठी उपलब्ध रहाण्याची अटही न्यायालयाने घातली आहे. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय सक्‍सेना यांनी देशाबाहेर जाऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी “ईडी’ने सादर केलेल्या आरोपपत्रात नाव असलेले राजीव सक्‍सेना हे दुबईस्थित “युएचवाय सक्‍सेना’ आणि “मॅट्रीक्‍स होल्डिंग्ज’ या दोन कंपनीचे संचालक आहेत. या व्यवहारातील दलाल ख्रिश्‍चियन मिशेल, ऑगस्टा वेस्टलॅन्ड आणि फिनमेकानिकाचे संचालक जिस्प ओर्सी आणि ब्रुनो स्पाग्नोलिनी, हवाई दलाचे माजी प्रमुख एस.पी.त्यागी आणि सक्‍सेना यांची पत्नी शिवानी यांच्याही नावांचा “ईडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिन्मेकानिकाची ब्रिटीश सहयोगी कंपनी ऑगस्टावेस्टलॅन्डकडून 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार भारताने 1 जानेवारी 2014 रोजी रद्द केला होता. या करारातील तरतूदींचा भंग आणि 423 कोटी रुपयांची दलाली दिल्याच्या आरोपावरून हा करार रद्द करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)