ऑगस्टमध्ये व्याजदर कपातीची शक्‍यता

नवी दिल्ली -पाऊस चांगला पडला तर रिझर्व्ह बॅंक ऑगस्ट महिन्यातील पतधोरणावेळी व्याजदर कपात करण्याची शक्‍यता असल्याचे एका अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. 5 एप्रिलला रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. यावेळी मात्र रिझर्व्ह बॅंक आपल्या व्याजदरात फारसा फेरफार करणार नाही.

कारण महागाईची आकडेवारी जाहीर व्हायची आहे. त्याचबरोबर पावसाळा सुरू होणार आहे. शेवटच्या तिमाहीत साधारणपणे 4.6 टक्‍के चलनवाढ होण्याची शक्‍यता आहे. ती रिझर्व्ह बॅंकेने ठरविलेल्या कमाल चलनवाढीपेक्षा कमी आहे. त्यामुळे बॅंकेकडून व्याजदर वाढ होण्याची अजिबात शक्‍यता नसल्याचे बॅंक ऑफ अमेरिकेने तयार केलेल्या अभ्यास अहवालात सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)