ऑगस्टमध्ये व्याजदरात वाढ होणार? 

आगामी काळातही महागाई वाढण्याची शक्‍यता 
नवी दिल्ली  – महागाई वाढत असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला ऑगस्ट महिन्यान पुन्हा व्याजदरात वाढ करावी लागणार असल्याचे विश्‍लेषकांना वाटते. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात पाव टक्‍का वाढ केल्यानंतर एचडीएफसी बॅंकेनेही पुन्हा व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्‍यता व्यक्त केली होती.
काल भारतीय उद्योग महासंघाने रेपो दरात वाढ केल्याबद्दल असमाधान व्यक्त केले होते. यामुळे भांडवल महाग होणार असल्यामुळे कंपन्या विस्तारीकरणाची कामे लांबणीवर टाकण्याची शक्‍यता आहे. रोजगार वाढण्यासाठी विकासदर वाढण्याची गरज असतानाचा रेपो दरात वाढ करण्यात आली असल्याचे महासंघाने सांगीतले आहे.

बीएनपी परिबा या संस्थेने म्हटले आहे, की किरकोळ आणि घाऊक महागाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला पुन्हा रेपो दरात पाव टक्‍के वाढ करावी लागणार आहे. युबीएस सेक्‍युरीटीज या संस्थेने म्हटले आहे, की क्रूडचे दर याच पातळीवर राहिले तरी महागाई वाढत जाणार आहे. त्यातच सरकारने कृषी उत्पादनांना दीडपट भाव देण्याचे जाहीर केले आहे. त्याचाही महागाई वाढण्यावर परिणाम होणार आहे, त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या पतधोरणात पतधोरणात रेपो दरात वाढ केली जाण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, बॅंक ऑफ अमेरिकेने सांगितले की, तुलनात्मक आकडेवारीमुळे महागाई जास्त वाढल्याचे भासत आहे. त्यामुळे आता व्याजदरात नजिकच्या काळात वाढ होण्याची शक्‍यता नाही. मे महिन्यात किरकोळ महागाई वाढून 4.87 टक्‍के झाली आहे. काही अन्नधान्याचे दर वाढल्यामुळे या महागाईत वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. एप्रिल महिन्यात या महागाईचा दर 4.58 टक्‍के होता तर गेल्या वर्षी मे महिन्यात या महागाईचा दर केवळ 2.18 टक्के इतका होता. याचा अर्थ महिन्याच्या आणि वार्षिक पातळीवरही ही महागाई वाढली आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात अन्नधान्याची महागाई 3.10 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. जी की एप्रिल महिन्यात 2.8 टक्‍क्‍यांनी वाढली होती. या महिन्यात ऊन जास्त असल्यामुळे भाजीपाला आणि फळे महाग होतात. पाऊस चांगला पडल्यानंतर या वस्तूचे दर कमी होण्याची शक्‍यता वाढते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)