ऑक्‍टोबरपर्यंत साडेचार हजार सायबर “दरोडे’

155 कोटींची फसवणूक : दररोज दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या दहा ते पंधरा


गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण काही शेकड्यामध्ये : गुन्हेगारांचा माग काढणे बनतेय अवघड

पुणे – पुणे शहरातील सायबर क्राईमचा विचार करता सायबर क्राईम सेलकडे ऑक्‍टोबरपर्यंत 4 हजार 484 तक्रारींमध्ये 155 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर, मागील वर्षभरात 5 हजार 741 तक्रारी आल्या होत्या. दररोज दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्याही दहा ते पंधरा इतकी आहे. त्याची संख्या वर्षभरात हजारोत असली तरी गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण काही शेकड्यामध्येच आहे. सायबर क्राईम सेलकडे तक्रार प्राप्त झाल्यावर त्याची पडताळणी करून गुन्हा संबंधीत पोलीस ठाण्याकडे नोंद करण्यास पाठवला जातो. यातील काही गुन्ह्यांचा तपास सायबर क्राईम सेल व पोलीस ठाणे अशा दोन्ही पातळ्यांवर होतो. बहुतांश गुन्हेगार हे परपराज्यातील असल्याने त्यांचा माग काढणे हे एक प्रकारचे आव्हान असते.

दरदिवसाला 14 ते 16 तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे आल्या आहेत. त्यासोबतच क्‍लीष्ट सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर एक्‍सपर्टसची मदत पोलिसांना घ्यावी लागते. अनेकदा तपासासाठी पोलिसांना परराज्यात धाव घ्यावी लागते. यामध्ये दिल्ली, नोएडा आदी परिसरांतून मोठ्या प्रमाणात देशभरात साबर गुन्हे केले जातात. गुन्हेगार परराज्यात किंवा परदेशातून गुन्हे करत असल्याने त्यांचा माग काढणे अवघड जाते. यासाठी तांत्रीक विश्‍लेषण करावे लागते. तर गुन्हेगार परराज्यात असल्याने त्यांला शोधण्यासाठी पथकेही तेथे रवाना करावी लागतात. तेथील स्थानिक पोलिसांच्या सहकार्यावर गुन्हेगाराला जेरबंद करणे अवलंबून असते. विशेषत: दिल्ली आणि नोएडा येथून जास्त सायबर क्राईमचे गुन्हे घडतात. या शहरांमधील अनेक ठिकाणांहून गुन्हेगार आपली सूत्रे हलवत असल्याचे आजवरच्या तपासात उघड झाले आहे.

लॅपटॉप, मोबाइल आणि बनावट सिमकार्डच्या आधारे हे गुन्हे केले जातात. गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर सातत्याने मोबाइल नंबर व ठिकाण बदलत असतात. यामुळे त्यांचे लोकेशन शोधणे अनेकदा अवघड होते. असे असताना सुद्धा सायबर क्राईमच्या पथकांनी अनेक गुन्हेगारांना परराज्यातून जेरबंद केले आहे. गुन्हेगारांना जेरबंद केले तरी त्यांच्याकडून फसवणुकीची रक्‍कम जप्त करणे अवघड बनते. हे गुन्हेगार मिळालेल्या रकमेची लगेच विल्हेवाट लावतात. गुन्हे करणाऱ्यांपैकी अनेकांनी कॉल सेंटरमध्ये काम केलेले असते. तर काही अशाप्रकारच्या बोगस कॉल सेंटरमध्येही काम करतात. यानंतर ते स्वत: कॉल सेंटर उघडून फसवणुकीचा धंदा करताना दिसतात. यामुळे दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारांनी संख्या वाढत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)