ऐ मेरे वतन के लोगों ज़रा आँख में भर लो पानी

-क्रांतिकारकांच्या प्रतिमांची प्रतिकृती अन्‌ तिरंगा
– झील एज्युकेशन सोसायटीचा अनोखा उपक्रम
– गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌ने घेतली नोंद

पुणे – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 3 हजार 536 विद्यार्थ्यांच्या सहभागातून मानवी तिरंगा झेंडा आणि क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांची प्रतिकृती साकारण्यात आली. झील एज्युकेशन सोसायटीच्या या उपक्रमाची दखल गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌ या अमेरिका येथील संस्थेने “लार्जेस्ट हुमन डीपीशन पर्सोनेज इन्ग्रॅव्हिन्ग’ या अंतर्गत नोंद घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झील एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबवत असतात. या वर्षीही राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. संस्थेचे संस्थापक संचालक संभाजी काटकर, कार्यकारी संचालक जयेश काटकर, पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जाधव, वेदप्रकाश शर्मा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात याप्रसंगी शहीद मेजर शशिधरण नायर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लता आणि वीर भगिनी सीना उपस्थित होत्या.

उपअधीक्षक जितेंद्र जाधव म्हणाले, “स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून साकारलेल्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर शहिद जवानांना अभिवादन करताना, आजच्या तरुण वर्गावरती ते जतन करण्याची व संविधानाने घालून दिलेल्या आदर्शांचे, मूल्यांचे, कर्तव्यांचे हक्काचे भान ठेवण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी पार पाडण्याची भावना मनात रुजवणे गरजेचे बनले आहे.’ यावेळी वेदप्रकाश शर्मा, जयेश काटकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सतीश देशमुख आणि गौतम गायकवाड हे उपस्थित होते. तसेच आर.जे. अजय यांनी उपस्थित राहून या मध्ये सहभाग नोंदवला व मुलांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. संजय देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. वीरेश चापटे आणि प्रा. सचिन वाडेकर होते.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)