ऐश्‍वर्या रायला आता व्हायचे आहे डायरेक्‍टर 

ऐश्‍वर्याला आता सिनेमांचे डायरेक्‍टर व्हायची ईच्छा आहे. नुकतेच अभिषेक बच्चननेच आपल्या पत्नीबाबतची ही माहिती सांगितली. अभिषेकने दोन वर्षे ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्याने “मनमर्जियां’तून नुकतेच कमबॅक केले आहे. त्याने डायरेक्‍टर बनावे असे उगाचच काही फॅन्सला वाटले होते. त्याला तसे विचारलेही गेले होते. तेंव्हा सध्या तरी डायरेक्‍टर बनण्याचा आपला काही विचार नाही, असे अभिषेकने स्पष्ट केले. पण बायको ऐश्‍वर्याला डायरेक्‍टर बनण्याची ईच्छा आहे, असेही त्याने सांगितले.
सिनेमाच्या शुटिंगदरम्यान ऐश्‍वर्या फिल्म प्रॉडक्‍शनच्या कामातील बारकाव्यांकडे खूपच बारीक लक्ष देत असते. आपल्या सीनबाबत ती खूप जागरुक असते. सीन शूट झाल्यानंतर तो योग्यप्रकारे झाला की नाही, हे ती आवर्जुन मॉनिटरवर बघत असते. यातूनच डायरेक्‍शनच्या कामातील तिचा रस दिसून येतो, असे अभिषेक म्हणाला. दरम्यान जर अभिषेकला डायरेक्‍शन करायचे झाले तर मुख्य प्रवाहातील एखाद्या व्यवसायिक सिनेमाचे डायरेक्‍शन करायला आपल्याला आवडेल, असेही अभिषेकने सांगितले.
आई जया बच्चनना आपले सगळे सिनेमे आवडतात. मात्र पप्पा अमिताभ बच्चन यांना मात्र सगळे सिनेमे आवडतातच, असे नाही. घरातील अन्य लोकांचा फिडबॅक काय आहे, हे बघून थोडा विचार करून मगच ऐश्‍वर्या आपला अभिप्राय देत असते, असेही अभिषेकने सांगितले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)