“ऐश्‍वर्यम हमारा’ एक पर्यावरणभिमुख गृहप्रकल्प

एस्सेन ग्रुप व एम. डी. ग्रुपचा प्रकल्प : “बुकींग’ला ग्राहकांचा प्रतिसाद

पिंपरी – साडेतीन मुहुर्तापैकी एक अशा अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर घर खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. नोटबंदी, रेरामुळे मंदीच्या सावटातून बाहेर आलेल्या बांधकाम विश्‍वासाठी यंदाची अक्षय तृतीया सुगीची ठरत आहे. सर्व सोयी सुविधांनी युक्त मोशी-चिखलीतील “ऐश्‍वर्य हमारा’ गृहप्रकल्पातील घर “बुकींग’ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ग्राहककेंद्रीत आणि पर्यावरणभिमुख या गृहप्रकल्पाची चर्चा सर्वत्र आहे.

आपले स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. “सेकंड होम’, गुंतवणूक म्हणूनही लोक गृह खरेदीला प्राधान्य देत असतात. शहरात अनेक गृहप्रकल्प आहेत. मात्र, ग्राहकाभिमुख आणि पर्यावरणस्नेही गृहप्रकल्पांची संख्या त्यामध्ये तोकडी आहे. ग्राहकांची गरज ओळखून आणि पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देत एस्सेन ग्रुप व एम. डी. ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोशी-चिखली रोडवर “ऐश्‍वर्यम हमारा’ या नावाने भव्य-दिव्य देखणा गृहप्रकल्प उभारला जात आहे. कामगार, नोकरदार वर्गाला आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकारता यावे यासाठी एस्सेन ग्रुपने “ऐश्‍वर्यम हमारा’ या गृहप्रकल्पांतर्गत सर्व सुविधांनी सुसज्ज अपार्टमेंट वाजवी किंमतीत उपलब्ध करुन दिले आहेत.

नव्याने विकसित होणाऱ्या मोशी परिसरात मोक्‍याच्या ठिकाणी असलेला हा गृहप्रकल्प ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. ऐश्‍वर्यम हमारा गृहप्रकल्प जेथे होत आहे तेथून भोसरी आणि एमआयडीसी परिसर काही मिनिटांच्या अंतरावर आहे. तसेच नाशिकफाटा प्रकल्पापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तळवडे आयटी पार्कही फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. एसएनबीपी स्कूल, कॉलेजही जवळच पाच मिनिटांवर आहे. त्यामुळे या गृहप्रकल्पामध्ये सदनिकांची नागरिकांकडून “बुकींग’ जोरदार सुरु असून दिवसें-दिवस ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.

विशेष म्हणजे “साईट व्हिजीट’ करणाऱ्या ग्राहकांच्या हस्ते याठिकाणी एक झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला जात आहे. केवळ वृक्षारोपणापुरते हे कार्य मर्यादीत न ठेवता येथे घर घेणाऱ्या ग्राहकाला आरोग्य पूर्ण व पर्यावरण सुविधा मिळाव्यात या दृष्टीने उपाययोजना या प्रकल्पाच्या उभारणीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेसाठी याठिकाणी घर खरेदीला ग्राहक प्राधान्य देत आहेत.

या सुविधांमुळे मिळतेय गृहप्रकल्पास पसंती…
“कम्युनिटी लिव्हिंग’चा अनुभव देणारा हा 1, 2, व 3 बीएचकेचा भव्य प्रकल्प असून येथे भरपूर “मॉडर्न ऍमिनिटीज’ पुरवण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी भरपूर मोकळी जागा, भव्य व प्रशस्त जलतरण तलाव, श्री. गणेशाचे मंदिर, नाना-नानी पार्क, आउटडोअर जिम, वॉकिंगसाठी सुंदर लॉन, ऍम्फी थिएटर, नक्षत्र गार्डन, गॅस पाईपलाईन, मल्टी पर्पज हॉल, पार्टी लॉन, सिटींग प्लाझा, इनडोअर गेम्स, मेडिटेशन हॉल, जॉगिंग ट्रॅक, योगा लॉन, हर्बल गार्डन, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, जिम आणि योगा हॉल, किडस्‌ पूल सारख्या अनेक अत्याधुनिक व आरोग्याची जपणूक करणाऱ्या सोयी सुविधांमुळे ग्राहकांची “ऐश्‍वर्यम हमारा’ प्रकल्पातील घर खरेदीला प्रथम पसंती मिळत असल्याचा दावा एस्सेन ग्रुप व एम.डी. ग्रुपच्या संचालकांनी केला आहे.

“सर्वांसाठी घर’ योजनेला हातभार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकास घर मिळावे व सर्वसामान्यांनाही घर मिळावे, असे आवाहन केले होते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारीत तसेच या योजनेत खारीचा वाटा उचलण्याच्या दृष्टीने प्रसिध्द एस्सेन ग्रुपने ऐश्‍वर्यम हमारा गृहप्रकल्प उभारला आहे. एस्सेन ग्रुप पिंपरी-चिंचवड येथे गेल्या 16 वर्षापासून गृहनिर्माण क्षेत्रात काम करित आहे. एस्सेन ग्रुपने पिंपरी-चिंचवडच नव्हे तर पुणे आणि महाराष्ट्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे नाव मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये गणले जात आहे. आज एस्सेन ग्रुप बांधकाम क्षेत्रात खुप प्रतिष्ठित मानले जाते. भीमसेन अग्रवाल, एस्सेन ग्रुपचे अध्यक्ष आहेत. ज्यांनी एकापेक्षा एक सुसज्ज गृहनिर्माण प्रकल्प केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)