ऐश्वर्या रायदेखील म्हणाली…. ‘मी टू’

हॉलिवूड निर्माता हार्वी वाइनस्टाइन विरोधात काही अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. यानंतर ‘मी टू’ या मोहिमेला सुरुवात झाली होती. ज्या महिला वर्षांनुवर्षे अत्याचाराला बळी पडत होत्या, पण याबद्दल कधीही उघडपणे बोलल्या नव्हत्या त्या महिला या मोहिमेअंतर्गत व्यक्त होत आहेत. दरम्यान, बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिनं जगभरात गाजलेल्या ‘मी टू’ (#MeToo) या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत सिडनीला व्यावसायिक कामानिमित्त गेली असता तिथल्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने  ही माहिती दिली

‘एखाद्या महिलेला कामासाठी तडजोड करावी लागत असेल, तिच्या अस्तित्वालाच आव्हान दिले जात असेल तर याबाबत तिने पुढे येऊन बोलणे, व्यक्त होणे खरंच कौतुकास्पद आहे, एक बाब चांगली घडत आहे ती म्हणजे महिला याविषयी बिनधास्तपणे बोलण्यासाठी पुढे येत आहेत. ही मोहीम केवळ जगातील काही देशांपर्यंत मर्यादित राहायला नको, मला नाही वाटत की, हा मुद्दा एवढ्या लवकरच संपेल.’ असे मत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने मांडलं. फक्त चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर इतर क्षेत्रातील महिलांनी अत्याचाराविरोधात आवाज उठवायला हवा. असंही ऐश्वर्या म्हणाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)