ऐश्वर्याचं ‘बर्थडे’ सेलिब्रेशन पाहिलंत का?

आपल्या मादक अदांनी अवघ्या सिनेरसिकांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनचा आज ४५वा वाढदिवस. आपल्या ४५व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटोज ऐश्वर्याने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्याने ‘व्हाईट’ ड्रेस परिधान केला असून तिच्यासोबत तिची आई वृन्दा राय, मुलगी आराध्य, पती अभिषेक तसेच कुटुंबातील व्यक्ती व मित्रमंडळी दिसत आहेत.

View this post on Instagram

💖🤗✨🌈😍

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऐश्वर्याने तिच्या वाढदिवसाचे तीन फोटोज शेअर केले असून एका फोटोमध्ये आई वृन्दा राय, मुलगी आराध्य, पती अभिषेक तसेच कुटुंबातील व्यक्ती व मित्रमंडळींनी ऐश्वर्या भोवती गराडा घातला असून ऐश्वर्या केक कापताना दिसत आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या आपली आई वृंदा राय यांच्या सोबत दिसत असून त्यांच्या मागेच ऐश्वर्याचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांचा फोटो दिसत आहे. 

View this post on Instagram

💖✨LOVE😍🌈🤗

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

तिसरा फोटो तिने पती अभिषेक आणि मुलगी आराध्य यांच्यासोबतचा शेअर केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)