ऐन परीक्षेत डीजेचा विद्यार्थ्यांना त्रास

संग्रहित छायाचित्र

मंचर -सध्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने डीजेच्या आवाजाचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. डीजे मालकांनी न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाचे आणि वेळेचे बंधन पाळावे. अन्यथा पोलिसांनी डीजे मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. तालुक्‍यात अवसरी, मंचर, घोडेगाव, पारगाव, कळंब, चांडोली, निरगुडसर आदी गावात अलिशान मंगल कार्यालय व लॉन्स उभारली आहेत. पूर्वी घरासमोरील कापडी मांडवात होणारे शुभविवाह कालबाह्य होऊन कार्यालयात लग्न होऊ लागली आहे. त्यामुळे नवरदेवाच्या वरातीच्या मिरवणूकीत वरातीपुढे डीजे साउंड सिस्टीम मोठ्या प्रमाणात वाजू लागली आहे. डीजे साऊंड सिस्टिम कर्कश मोठ्या आवाजाने वाजू लागल्याने सर्वजण त्रस्त झाले आहे. शून्य ते चार वयोगटातील लहान मुलांना झोप न येणे, ज्येष्ठ नागरिकांना हृदय विकाराचा झटका येणे हे प्रकार होत असल्याने न्यायालयाने डीजेच्या आवाजावर नियंत्रण आणले आहे. डीजे मालक न्यायालयाचा आदेश धुडकावून कर्कश आवाज करत आहे. पोलिसांनी संबंधित डीजे चालकांच्या विरोधात कडक कारवाई करावी, या मागणीने जोर धरला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)