ऐन परीक्षेच्या वेळी शिक्षकांना प्रशिक्षण

कामशेत – जिल्हा परिषद शाळेतील तालुक्‍यातील सर्व शिक्षकांना टप्प्या-टप्प्याने ऐन परीक्षेच्या वेळी पहिली ते पाचवी स्तरावरील प्रशिक्षण नोव्हेंबरपासून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची तक्रार पालक करीत आहेत.

मूल्यवर्धन, भाषा व गणित या विषयाचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत आहे. सततच्या प्रशिक्षणामुळे शिक्षक वर्गही त्रासला आहे. मार्च अखेरमुळे शालेय कागदपत्रे पूर्ण करण्याचे कामही शिक्षकांना करावे लागते. यामुळे शिक्षकांचे मूळ काम मुलांना शिक्षण देणेच मागे पडत असल्याची खंत शिक्षक देखील व्यक्‍त करू लागले आहेत.

या प्रशिक्षणाचा उपयोग पुढील वर्षासाठी आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान प्रशिक्षण व्हावे, अशी अपेक्षा शिक्षक व्यक्‍त करत आहेत. गट शिक्षणाधिकारी एम. व्ही. वाव्हळ यांनी सांगितले, प्रशिक्षणाचे नियोजन राज्य शासनाने तालुका स्तरावर केले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)